Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जयश्रीताईंना हात म्हणजे विकासाला साथ’ या घोषणांनी गाजला प्रचाराचा माहौल

जयश्री महाजन यांना मिळतोय जनतेचा जबरदस्त पाठिंबा

by Divya Jalgaon Team
November 12, 2024
in जळगाव, राजकीय
0
जयश्रीताईंना हात म्हणजे विकासाला साथ’ या घोषणांनी गाजला प्रचाराचा माहौल

जळगाव (प्रतिनिधी) –  जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार आता जोमाने सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “जयश्रीताईंना हात म्हणजे विकासाला साथ” या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत.

शहराच्या विविध भागात जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत सहभागी नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ‘विकासाची साथ’ या घोषणांनी शहरातील वातावरणात नवी चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. जयश्री महाजन यांच्या शहर विकासाच्या अजेंडाला आता जनतेतून भक्कम पाठबळ मिळत असून, त्यांच्याकडे शहरातील आगामी नेतृत्व करणारा एक मजबूत उमेदवार म्हणून बघितले जात आहे.
जयश्री महाजन यांचा महापौरपदाचा अनुभव त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. महापौरपदी असताना सदा कार्यरत राहत त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे, त्यांच्याबद्दल जळगावकरांच्या मनात विश्वास आणि समर्थन वाढले आहे. त्यावेळच्या प्रशासकीय कार्याचा अनुभव आणि त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांना जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या कामाची सर्वसामान्यांकडून पोचपावती मिळत आहे.

जयश्री महाजन यांचा प्रचार फेरींमुळे विरोधकांना आता विविध प्रचाराच्या मार्गांचा अवलंब करण्यास भाग पाडले आहे. प्रतिद्वंद्यांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. महाजन यांच्या मजबूत पाठिंब्यामुळे विरोधकांच्या प्रचार यंत्रणेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते जयश्री महाजन यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. या रॅलीत जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता जयश्री महाजन यांच्या विजयाची शक्यता आणखी मजबूत होत आहे.

Share post
Tags: #jalgaon shivsena#Jayshree Tai Mahajan#shivsena thakre gat#जयश्री महाजनशिवसेना
Previous Post

मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या – शरद पवार

Next Post

आदिवासी बांधवांकडून मिळालेल्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही – रोहिणी खडसे

Next Post
आदिवासी बांधवांकडून मिळालेल्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही – रोहिणी खडसे

आदिवासी बांधवांकडून मिळालेल्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही - रोहिणी खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group