Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

by Divya Jalgaon Team
November 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

मुक्ताईनगर – कुऱ्हा- कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्येपाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या पाठपुरावा करतील. कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली. आता रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी उपस्थित नागरिकांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलतांना डॉ.बी.सी. महाजन म्हणाले, कुऱ्हा वढोदा परिसरातील शेती सिंचित होऊन कोरडवाहू परिसर हिरवागार होऊन शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आ.एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा वढोदा परिसर उपसा सिंचन योजना आणली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला परंतु द्वेषभावनेतून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी मिळाला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक आहे. मागील काळात रोहिणी खडसे यांनी सतत पाठपुरावा करून जोंधनखेडा येथील कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लावला, हे आपण अनुभवले आहे. त्यांचा पारंबी, हिवरा, जोंधनखेडा, कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला. नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा पुढे नेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे डॉ. बी.सी. महाजन यांनी आवाहन केले.

यावेळी विशाल महाराज खोले यांनी सांगितले की, कोरोना काळात कुऱ्हा येथे लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. सेंटर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. स्वखर्चातून कोविड सेंटर साठी तीस बेड आणि मास्क औषधे उपलब्ध करून दिले. रोहिणी खडसे या जनतेच्या सुखदुःखात धावून येणाऱ्या सर्वसामान्य उमेदवार असून त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हसमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा.

गेल्या तीस वर्षांपासून आ.एकनाथराव खडसे हे कुऱ्हा वढोदा परिसराच्या उन्नतीसाठी झटत आहेत पहिल्यांदा मुक्ताईनगरचे आमदार झाल्यानंतर त्यांनी कुऱ्हा परिसराला पक्क्या डांबरी रस्त्यांनी जोडले. कुऱ्हा परिसराचा पूर्वी पावसाळ्यात पुरामुळे मुक्ताईनगर परिसराशी संपर्क तुटत होता. नाथाभाऊंनी सर्व नदी नाल्यांवर लहान मोठया पुलांची निर्मिती केली. धुपेश्वर पुलाची निर्मिती करून कुऱ्हा परिसराला मलकापूरसोबत जोडले. त्यामुळे दळणवळण सोयीचे होऊन व्यापार वाढला, नातेसंबंध जवळ आले. नाथाभाऊ यांनी इको टुरिझम अंतर्गत वढोदा येथील मच्छिन्द्रनाथ संस्थान आणि चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसरात भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

Share post
Tags: #Kurha Wadoda Yojana#NCP Sharad Chandra Pawar Party#Rohini Khadse#आ.एकनाथराव खडसे#कुऱ्हा वढोदा योजना
Previous Post

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

Next Post

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..

Next Post
डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group