जळगाव- “ ईमाम-उल-हिंद ” मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश उर्दू कौन्सिल तर्फे स्मृती कार्यक्रम “ शिक्षण दिन ” म्हणून साजरा करण्यात आला. संस्थेचे सईद पटेल यांनी कार्यक्रमाचे उद्दीष्ट व प्रास्ताविक सांगितले, डॉ.अनिसउद्दीन शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
शेख जय्यान अहमद यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. कार्यक्रमात पठाण असिफ खान, तबरेज असलम, काशिफ अंजुम आणि वसीम अकिल शाह यांनी मौलाना आजादच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि मौलाना यांचे विचार व शिकवण आधुनिक संदर्भांसह लागू करून नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याची शक्यता त्यांनी प्रकाशात आणली.
या वेळी असीम शाह शफीक यांनी केलेल्या शिक्षण सेवांच्या सन्मानार्थ त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, हे लक्षात घ्यावे की, रोटरी क्लब,जळगावच्या वतीने अलीकडेच असिम शाह यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अध्यक्षीय भाषणात, खान्देश उर्दू परिषदेचे अध्यक्ष अकील खान बियावाली यांनी देशाची राजकीय आणि सामाजिक स्थिती लक्षात घेता म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणाला मौलाना आजाद सारखे कोणतेही आंतरराष्ट्रीय ICON मिळू शकले नाही आणि सध्याची परिस्थिती पाहता, याची शक्यता कमीच आहे. जर आपण मौलाना यांची चळवळ व संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोचविण्यात सफल झालो