Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

आज जुने जळगाव परिसर, शिवकॉलनी, हरिविठ्ठल नगर परिसरात रॅली

by Divya Jalgaon Team
November 4, 2024
in जळगाव, राजकीय
0
ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

जळगाव –  येथील विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे फुटणार आहे. तेथून जुने जळगाव परिसरात आ. भोळे यांची प्रचार रॅली निघणार आहे.

भाजपच्या मंडल क्र. २ तथा प्रभाग क्र. ३ ते ५ या विभागात आज दि. ५ रोजी प्रचार केला जाणार आहे. राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात होऊन जुने जळगाव परिसरात प्रचार रॅली निघणार आहे. तर दाणाबाजार परिसरात समारोप होईल. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या मंडल क्र. ४,६ तथा प्रभाग क्र. ७, ११ या विभागात दुपारी ३ वाजता शिवकॉलनी स्टॉप येथून प्रचाराची सुरुवात होऊन आशाबाबा नगर, खंडेराव नगर मार्गे हरिविठल नगर येथील बाजारपट्टा येथे भेटी करून श्रीधर नगरात रॅलीचा समारोप होणार आहे.

प्रचार रॅलीत महायुतीमधील घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व इतर मित्रपक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही विकासकामांसाठी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रचार रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share post
Tags: #Rajumama bhole#Ram Mandir jalgaon#vidhansabha 2024#आमदार राजुमामा भोळे#ग्रामदैवत श्रीराम मंदिर
Previous Post

गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला म्हसावद, शिरसोली, वावडदा भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

वंचीत आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांचा उद्याचा प्रचार दौरा

Next Post
वंचीत आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांचा उद्याचा प्रचार दौरा

वंचीत आघाडीचे उमेदवार ललित घोगले यांचा उद्याचा प्रचार दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group