जळगाव – जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला म्हसावद, शिरसोली, वावडदा, विटनेर भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विटनेर येथे तर त्यांची थेट घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
पद्मालय तीर्थक्षेत्रावर प्रचार नारळ वाढविल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील प्रचाराला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात म्हसावद, बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, पाथरी, वडली, डोमगाव, जवखेडा, विटनेर, जळके, बिलवाडी आदी गावांना भेटी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो., रामदेववाडी, सुभाषवाडी, वावडदा, मोहाडी, दापोरा आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी काढण्यात प्रचार रॅलीचे सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले. महिलांनी त्यांचे औक्षण केले.
यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोलीच्या सरपंच उषाबाई पवार, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर, विटनेरचे उपसरपंच शांताराम पाटील, विकास सोसायटीचे संचालक गणेश परदेशी, प्रकाश भगत आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.