Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

by Divya Jalgaon Team
October 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

रावेर (प्रतिनिधी) – रावेर यावलच्या रावेर यावलच्या औद्योगिक विकासासाठी, माता भगिनांच्या रक्षणासाठी व परिसराच्या सर्वांगिण विकासाचे ब्रीद घेऊन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे, महाविकास आघाडी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी सांगितले.

आज मंगळवार (दि. २९) सकाळी ९.३० वाजता आठवडे बाजार रावेर येथून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील माजी मंत्री एकनाथराव खडसे, श्रीराम पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते ॲड. रविंद्रभैय्या पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, राजाराम गणू महाजन, रमेशदादा चौधरी, संदीपभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे एजाज मलिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रावेर यावल परिसराचा विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या पूर्वजांच्या पाऊलवाटेवर अजून पुढचे पाऊल टाकत सकारात्मक व शाश्वत विकासाची परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन यावेळेस धनंजय शिरीष चौधरी यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

Share post
Tags: #Dhanajay choudhry#Raver matdar sangh#shirish choudhri#vidhansabha 2024#धनंजय शिरीष चौधरी
Previous Post

सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

Next Post
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group