Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

by Divya Jalgaon Team
October 14, 2024
in जळगाव, सामाजिक
0
स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

जळगाव – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ५०७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शहरातील सेवाभावी संस्थांनामधील आवश्यकता असणाऱ्यांसाठी ७५० जणांनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.

कंपनीच्या भारतभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३५८, फूड पार्क डिव्हाईन पार्क १०१, अलवर ०४ चित्तूर ११, बडोदा १४, हैदराबाद १९ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क येथे आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले. यामध्ये जैन प्लास्टीक पार्क मधील सहकारी संगिता खंबायत यांनी हरतालिकेचे व्रत असतानासुद्धा रक्तदान करुन महिलांना रक्तदानाविषयी प्रेरणा दिली.

प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्यूकल्चर प्लान्ट फॅक्टरी व जैन फूडमॉल या सहकाऱ्यांसाठी प्लास्टिक पार्कच्या डेमोहॉल (ज्ञानलय), अॅग्रीपार्क, फूडपार्क, एनर्जीपार्क व डिव्हाईनपार्कच्या सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या दवाखान्याच्या वरच्या हॉलमध्ये रक्तदानाची सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान व्यवस्था करण्यात आलेली होती. जळगाव सिव्हील हॉस्पीटल, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्त संकलन केले.

‘रक्तदाता-एक जीवनरक्षक’ यानुसार लोकांना संकट काळात जीवनदान देणारे हे मानवतेचे पुजारी, अशा लोकांना मदत करतात की, जेथे जात, धर्म, पंथ आणि इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न होता गरजूंना जीवन प्रदान केले जाते. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या पासून सुरु झालेल्या सामाजिक कार्यामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा कंपनीला अभिमान आहे. सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपल्या कंपनीचे नाव जेव्हा-जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. त्यासाठी संपूर्ण जैन कुटुंबीय नेहमीच प्रयत्नशील असतात. मातृतुल्य अशा सौ. कांताई जैन यांच्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे त्याचेच एक प्रतीक होय.

७५० जणांनी घेतला मिष्टान्नाचा लाभ

सौ. कांताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधीकॉलनीतील अंध शाळा, सावखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रम त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दीपस्तंभ फाउंडेशनचे विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन दिले गेले. त्यात मिक्स व्हेज, चवळीची भाजी, मसाले भात, पुरी, कचोरी आणि गोड पदार्थ असा मेनु होता. जैन इरिगेशनच्या राजाभोज विभागातील सहकाऱ्यांनी भोजन वाटप केले.

Share post
Tags: (#Jain Irrigation) #जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन#Social news Related#स्व. कांताई जैन
Previous Post

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

Next Post

१३ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन,आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

Next Post
१३ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन,आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

१३ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन,आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group