Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक

by Divya Jalgaon Team
November 12, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक

पाटणा : बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू यांचे गठबंधन असलेल्या सरकारची सत्ता स्थापन होणार आहे. या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्या अति तटीची झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, महागठबंधन बहुमत मिळवू शकले नाही. निवडणुकीतील पराभवानंतर आज लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी मंथन बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी महागठबंधनमधील सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महागठबंधनच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेस आणि वामदलांचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार आहेत. बैठक सकाळी 11 वाजता राबडी देवी यांच्या निवासस्थानी होणार आहे. बैठकीनंतर महागठबंधनाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते.

जेडीयूच्या आमदारांचीही बैठक आज होण्याची शक्यता आहे. याआधी काल बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनी निवडणुकीच्या निकालांनंतर एनडीएला मिळालेल्या विजयासाठी सर्वांचे आभार मानले. बिहार निवडणूकीत एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. यासाठी जनतेचे आभार प्रकट करत नीतीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला जे बहुमत दिले, त्यासाठी जनता-जनार्दनला माझा प्रणाम. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यासाठी आभार मानतो.’

Share post
Tags: #Bihar Marathi news#Bihar Political news#RJD#Tejashwi YadavDivya Jalgaon NewsPatnaआज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक
Previous Post

बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त

Next Post

Google Play Store: तुमच्या फोनवरून त्वरित हटवा ‘हे’ 7 अ‍ॅप्स

Next Post
Google Play Store: तुमच्या फोनवरून त्वरित हटवा 'हे' 7 अ‍ॅप्स

Google Play Store: तुमच्या फोनवरून त्वरित हटवा 'हे' 7 अ‍ॅप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group