Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त

by Divya Jalgaon Team
November 12, 2020
in राष्ट्रीय
0
बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त

नवी दिल्ली : भाजपच्या बड्या नेत्या, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत. ट्विट करुन आपण कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.

गेल्या महिन्याच्या 28 तारखेला (28 ऑक्टोबर) स्मृती इराणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर नवी दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराअंती आज अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत स्मृती इराणी भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. त्या प्रचारसभांमध्ये सहभागी झाल्या.याचदरम्यान त्या अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं म्हटलं जात होतं.

स्मृती इराणी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Share post
Tags: #Corona Free#New Delhi marathi news#Smriti Irani#Union MinisterDivya Jalgaon NewsNew Delhi NewsUnion Minister Smriti Irani Corona Freeबालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त
Previous Post

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Next Post

आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक

Next Post
आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक

आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group