Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू – डाॅ. सुदर्शन अय्यंगार

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Divya Jalgaon Team
October 10, 2024
in जळगाव, सामाजिक
0
अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू – डाॅ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव – चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी डाॅ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत डाॅ. सुदर्शन अय्यंगार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डाॅ. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डाॅ. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डाॅ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डाॅ. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डाॅ. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Share post
Tags: #अहिंसा#महात्मा गांधी जयंतीशांती
Previous Post

‘चहेलम’ ऐवजी मुलींच्या मदरशात दान

Next Post

शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई

Next Post
शब्दाने नाही, तर कृतीने जगा – अब्दुलभाई

शब्दाने नाही, तर कृतीने जगा - अब्दुलभाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group