Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्त्री ही आधुनिक युगातील दुर्गा – रोहिणी खडसे

by Divya Jalgaon Team
October 5, 2024
in Uncategorized
0
स्त्री ही आधुनिक युगातील दुर्गा – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – स्त्री ही आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळते परंतु आजकाल महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून माता महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे मुक्ताईनगर येथे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणून यावेळी देवीची म्हणजे  शक्तीची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते. नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात.

या रूपांची सर्वांना ओळख व्हावी व परिसरातील मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संवेदना फाउंडेशनतर्फे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रकला स्पर्धेत नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांनी देवीच्या रूपांचे  उत्कृष्ठ चित्र रेखाटले आहेत यातून नक्कीच भविष्यातील उत्तम कलाकार घडतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना बक्षीस देउन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या, की नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव आहे या उत्सवात आपण आदिशक्ती दुर्गा मातेच्या विविध रूपांची उपासना करतो स्त्री ही आजच्या आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असते. दुर्गा मातेने महिषासुराचाआणि असुरांचा वध करून संकट दूर केले तसेच प्रसंगी स्त्री दुर्गेचा अवतार घेऊन आपल्या परिवारावर आलेल्या संकटांत खंबीर भूमिका घेऊन संकट दूर करत असते परंतु आजकाल समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून महिषासुर मर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हाच वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे.ई. स्कुलचे मुख्याध्यापक नितीन भोंबे, कला शिक्षक सुरवाडे, व्ही एम चौधरी, व्ही डी पाटील, नितीन ठाकूर, भगवान कोल्हे व इतर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share post
Tags: #Congress Sharad Chandra Pawar#काँग्रेस शरदचंद्र पवार#प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

Next Post

जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

Next Post
जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group