जळगाव – इकरा शिक्षण संस्थेचे एच.जे.थिम कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, उपाध्यक्ष डॉ.इक्बाल शहा, सचिव एजाज मलिक तसेच संस्थेचे सदस्य अमिन बादलीवाला, अजिज सालार, प्रा. जफर शेख, नबी दादा बागवान, तारिख अन्वर शेख हे आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे घेतलेल्या विविध कार्यक्रमांची संक्षिप्त माहिती दिली. कॉलेजच्या परिसरातील, कार्यालय, पार्किंग, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि कॉलेज सभोवतीच्या परिसरातील झाडुन कचरा, झाडांचा पालापाचोळा, कागद आणि प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी डॉ.अब्दुल करीम सालार यांनी समाजामध्ये परिसर स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता, स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही होणे गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शेवटी प्रा. हाफीज शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.