जळगाव प्रतिनिधी । जळगावातील पिंप्राळा परिसरात माथेफिरूंनी दोन दुचाक्या पेटविल्या. पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात घरासमोरील ओट्यावर लावलेल्या दोन दुचाक्यांनी अज्ञात व्यक्तिंनी आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगावातील पिंप्राळा परिसरात माथेफिरूंनी दोन दुचाक्या पेटविल्या. शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे राहुल गबरू पवार (वय-२४, रा. सावखेडा ता. गणपती नगर) हे खासगी नोकरीला आहे. त्यांच्यासोब भाऊ पृथ्वीसिंग आणि राजेश सोबत राहतात. एकत्र कुटुंब राहतात. त्यांच्याकडे (एमपी १२ एमव्ही ९२४२) आणि (एमपी १२, एमएक्स ५३४९) क्रमांकाच्या दोन दुचाक्याआहेत. कामाच्या निमित्ताने तिघे भाऊ दोन्ही दुचाकी वापरतात. नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता जेवण करून सर्वजण झोपले. त्यावेळी दोन्ही दुचाकी पार्किग आवारात लावल्या होत्या. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तिंनी दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. घरासमोरील वॉचमन राधेश्यात पवार यांनी आरडाओरड केल्यानंतर प्रकार लक्षात आला. त्यानंतर पाणी टाकून आग विझविली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताब पठाण करीत आहे.