यावल प्रतिनिधी – यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिन या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थाध्यक्ष निताताई गजरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाळेतील विदयार्थी फैजान तडवी याने प्रत्यक्ष बिरसा मुंडा यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष निताताई गजरे, मुख्याध्यपिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षिका पूनम कोळी, कीर्ती ननवरे,रुकसार तडवी,खुशबू चौधरी,मंगला पाटील,नलिनी बडगुजर, योगिता पाटील,शबनम तडवी ,ममता तडवी,वैष्णवी धांडे,प्रतीक्षा बेंडाळे,प्रियंका इंगळे,चैताली तायडे,योगिता महाजन,शारदा पांडव, हर्षाली पाटील,अनिल तडवी,शरद कोळी, मुबारक तडवी, राजू पाटील, जमील तडवी, सोपान कोळी उपस्थित होते.