Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर – अनिल जैन

छात्र संसद आयोजित इंटरनेशन लीडरशीप टूर या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा संवाद

by Divya Jalgaon Team
August 2, 2024
in कृषी विषयी, जळगाव
0
उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर – अनिल जैन

जळगाव – ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत.’ या सोबतच शाश्वत विकास, आधुनिक शेती, युवकांसाठी कृषी व कृषी उद्योगातील संधी, गांधीवाद याबाबतचा सुसंवाद जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी साधला. मुंबईच्या छात्र संसद आयोजित इंटरनेशन लीडरशीप टूर या उपक्रमांतर्गत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, पारुल विद्यापीठाचे सुमारे ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, छात्र संसदचे अध्यक्ष कुणार शर्मा, आदित्य वेगडा हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम जैन इरिगेशनच्या मुंबई कार्यालयात झाला.

इंटरनेशन लिडरशीप टूर २०२४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी  रोल मॉडेल म्हणून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधावा अशी विनंती छात्र संसदेचे अध्यक्ष अॅड कुणाल शर्मा यांनी केली होती. त्यानुसार “भारतातील कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण सिंचन उपाय” या विषयावर अनिल जैन यांनी उपस्थितांसमवेत सविस्तर चर्चा केली. संपूर्ण भारतात ७ दिवसांचा टूर   असून सहभागी प्रतिनिधी  २४ ते २६ जून तीन दिवस मुंबईत आणि दिल्लीमध्ये २७ ते २९ जूनपर्यंत ठरवून दिलेल्या रोल मॉडेल कंपन्यांना भेटतील असा हा उपक्रम आहे. यावर्षी हे विद्यार्थी अनिल जैन यांच्यासह राज्यपाल मा. रमेश बैस, उद्धव ठाकरे, राजदीप सरदेसाई, किरण बेदी, संजय सिंग, आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

Share post
Tags: #Agriculturaljain irrigationजैन इरिगेशन
Previous Post

आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य श्री सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group