Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटील वाटणार १० हजार छत्री व टीशर्ट

by Divya Jalgaon Team
July 24, 2024
in जळगाव, राजकीय
0
कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

sunil thakur

जळगाव – उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी त्यांनी जळगाव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या तर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी शर्टचे आज उध्दव ठाकरे यांनी कौतूक केले. छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. यावेळी बाळासाहेबांची २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले. यावेळी सुनिल ठाकूर उपस्थित होते.

कुलभूषण पाटील हे जळगाव शहरातील शिवसेनेचा तरुण आक्रमक चेहरा असून विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचे काम करत आहेत. उपमहापौर असतांना केलेल्या कामामुळे त्यांची शहरात चांगली ओळख निर्माण झाली आहे. पिंप्राळा उपनगरात त्यांनी रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे जाळे विणले आहे. पिंप्राळातील त्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्यावेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. यामुळे आगामी विधानसभेनिमित्त त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Share post
Tags: #Kulbhusan patil#shivsena thakre gat#Udhaw thakre birthday newsउपमहापौर कुलभुषण पाटील
Previous Post

ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Next Post

धरणगावातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Next Post
धरणगावातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

धरणगावातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group