जळगाव – कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर, करवंद, अमरावती मध्यम प्रकल्प, असे एकूण ११ मध्यम प्रकल्प, लघु ४५ प्रकल्प, को. प. बंधारे २२ व वळण बंधारे ३० असे एकूण १०८ प्रकल्प तसेच नंदूरबार जिल्ह्यातील, रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण ३, लघु ३३ प्रकल्प, को.प. बंधारे ६, वळण बंधारे २० असे एकूण ६२ तसेच धुळे व नंदुरबार , जिल्ह्यातील अधिसुचित नदी / नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागायतदारांना कळविण्यात आले आहे की, दि. १४ ऑक्टोंबर, २०२० ते २८ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीकरीता दि. १५ ऑक्टोंबर, २०२० पासून सुरु होणारा रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करावे.
सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. ७, ७ (अ), ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत सादर करावेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे.
मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ नामंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये.
थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे/मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्द करण्यात येईल. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असे धुळे पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता धि. र. दराडे यांनी कळविले आहे.