जळगाव – श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील रामेश्वर कॉलनीत हरेश्र्वर हनुमान मंदिरात महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
याप्रसंगी जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विशाल देशमुख, नरेंद्र जाधव, सुनील वाणी, दादा ढमाले, दीपक मांडोळे, शरद सोनवणे यांसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी करणदादा पाटील यांचे पुष्गुच्छ देवून स्वागत केले.