जळगाव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव कबचौउमवि नगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम आज पार पडला झाला. यावेळी नगरअध्यक्ष प्रा. गौरव खोडपे सर, नगर मंत्री आदेश पाटील उपस्थित होते.
यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील अभाविप जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी नगर वतीने केलेल्या कार्याचा उजाळा नगर मंत्री आदेश पाटील यांनी दिला व त्यानंतर प्रा खोडपे सर यांनी मागील शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी विसर्जित केली. तसेच प्रा.डॉ एम हुसैन सर यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ जळगाव कवयत्री बहिणाबाई चौधरी नगर कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारणीत नगर अध्यक्ष डॉ. प्रा.एम हुसैन, नगर मंत्री आदित्य नायर, सह मंत्री संकेत सोनवणे, सहमंत्री शुभम शुक्ला, TSVK प्रमुख आकाश पाटील, TSVK सहप्रमुख प्रतिक भावसार, विद्यार्थीनी प्रमुख श्राद्ध सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख विपुल भिराडे, स्टुडंट्स फॉर सेवा (SFS) कार्यप्रमुख क्रांती पाटील, थिंक इंडिया प्रमुख सृष्टी पाटील, थिंक इंडिया सहप्रमुख ऋत्विक पाठक, SFD प्रमुख योगेश महाले, महाविद्यालय प्रमुख योगेश पाटील तर कार्यकारिणी सदस्य – प्रा खोडपे सर,परिमल पाटील, भूपेंद्र बानाईत, ज्ञानेश्वर उद्देवाल, हर्षलता पाटील, मोहित पाटील,ऋत्विक माहुरकर,आदेश. अशा प्रकारे कवयित्री बहिणाबाई चौधरी नगर कार्यकारिणी नगर असेल.
यानंतर नगर मंत्री आदित्य नायर यांनी सर्व कार्यकारिणी सदस्याचें अभिनंदन केले व आगामी काळात शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल व प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.