जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागा शहर सचिव पदी जितेंद्र पाटील यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष तथा नेते बापूसाहेब दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पाचोरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात जितेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्षॲड.जमील देशपांडे शहराध्यक्ष किरण तळले, विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, चेतन पवार, सतीश सैंदाणे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शहराध्यक्ष कुणाल पवार, जनहित कक्षाचे संघटक राजेंद्र निकम यांनी जितेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जितेंद्र पाटील यांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असून रुग्णालयाशी संबंधित मदतीबाबत जितेंद्र पाटील यांच्याशी शहरासह जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांनी संपर्क साधावा अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी दिली आहे.