चोपडा – येथील दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागामार्फत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे सौजन्याने नवीन शैक्षणिक धोरणानुसार द्वितीय वर्ष विज्ञान वनस्पती शास्त्र विषयाची अभ्यासक्रम पूर्नरचना कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एम.बी.पाटील, प्राचार्य डॉ डी.ए.सुर्यवंशी, विभाग प्रमुख डॉ आर.एम.बागुल, वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ विद्या पाटील, डॉ संभाजी पाटील, डॉ सुनील पाठक, डॉ तन्वीर खान, उपप्राचार्य प्रा.नरेंद्र कोल्हे, प्रा.डॉ.ए.एल चौधरी, समन्वयक डॉ शैलेश वाघ,यांचे सह कबचौ उमवि परिक्षेत्रातील बहुसंख्य प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे कनव्हेनर प्रा डॉ.आर.एम. बागुल यांनी केले. कार्यशाळेचे उद्घाटन वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ.एम.बी.पाटील यांनी केले.
या प्रसंगी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदलांनुसार अपेक्षित विद्यार्थी विकास व रोजगार कौशल्य कसे विकसित करता येईल या बाबाबतीत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉ डी.ए.सुर्यवंशी यांनी देखील रोजगार कौशल्य निर्मिती व्हावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम पूर्नरचना करावी असे सहभागी प्राध्यापकांना आवाहन केले.कार्यशाळेसाठी सेशन कोऑर्डीनेटर म्हणून डॉ पी.एन सौदागर यांनी काम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ के.डी.गायकवाड यांनी केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी लाईफ सायन्सेस विभागातील शिक्षक स.प्रा वृषाली सोनगीरे स.प्रा व्हि.के.पटेल, शिक्षकेतर कर्मचारी लॅब असिस्टंट महेंद्र क्षीरसागर, प्रतिभा पाटील ,रविंद्र पाटील, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.