जळगाव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण 31 हजार 562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20 हजार 166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे.आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर 24 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरातून 55, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 2347, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 407, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 291, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2517, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2445 असे एकूण 8062 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 1596, रावेर विधानसभा मतदारसंघातून 831, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 586, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2931, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 42, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून984 असे एकूण 6,934 बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोन शिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर 48 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 163, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 3923, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1125, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 455, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2766, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 4023 असे एकूण 12,463 विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती असलेले पोस्टर्स,बॅनर्स,झेंडे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 771, रावेर विधानसभा मतदारसंघातून 541, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 649, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2195, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 253, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 734असे एकूण 5125 बॅनर्स, पोस्टर्स,झेंडे फलके हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर 72 तासात जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 222, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 5258, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1197, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 570, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 1408, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2382 असे एकूण 11,037 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 3273, रावेर विधानसभा मतदारसंघातून 491, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 360, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 3266, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 346, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 371, असे एकूण 8107 बॅनर्स,पोस्टर्स, झेंडे, तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.