Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुक्ताई चांगदेव मंदिरावर आ एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे यांच्या तर्फे हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी

by Divya Jalgaon Team
March 8, 2024
in जळगाव, सामाजिक
0
मुक्ताई चांगदेव मंदिरावर आ एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे यांच्या तर्फे हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी

मुक्ताईनगर – श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायदळ चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात त्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो.

सध्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर चांगदेव येथे दाखल झालेले आहेत त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या तर्फे आदिशक्ती मुक्ताई आणि योगिराज चांगदेव यांच्या पद स्पर्शाने पावन कोथळी,मेहुण,चांगदेव, मुक्ताईनगर या पावन तिर्थक्षेत्रांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली.

रोहिणी खडसे यांनी हेलिकॉप्टर मधून आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी ,योगिराज चांगदेव मंदिर चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण ,नविन आदिशक्ती मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर या तिर्थ स्थानांवर पुष्पवृष्टी केली
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र कोथळी, आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र तापीतीर मेहुण, योगिराज चांगदेव मंदिर श्री क्षेत्र चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर या पावन तिर्थ स्थानांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्यवृष्टी करून आदिशक्ती मुक्ताई ,योगिराज चांगदेव यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.

हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करताना टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद देणारा भरलेला वैष्णवांचा मेळा याची देही याची डोळा साठवता आला. यात्रोत्सवानिमित्त प्रथमच मुक्ताई, चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली असून उपस्थित वारकरी भाविक भक्तांमध्ये हा नयनरम्य सोहळा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय ठरला.

Share post
Tags: #Rohini Khadse#Temple#Yatra festival at Changdev#श्री संत मुक्ताई
Previous Post

सर्व खाजगी क्षेत्रातील शिक्षकांचा होणार सत्कार ; विद्या प्रबोधिनीचा उपक्रम

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group