जळगाव – येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असणार आहे. कारण या दिवशी अयोध्या येथील श्री राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश याचा आनंद साजरा करत असतांना, आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शहरातील नवजीवन प्लसही या उत्सवासाठी सजले आहे.
आज (दि.२०) रोजी श्रीराम प्रतिमेची शहरातील सचिन नारळे आणि सौ.अपूर्वा नारळे यांच्याहस्ते पूजा करण्यात येवून, खास प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील सर्वात मोठ्या उत्सवासाठी महाबचतीच्या मोठ्या ऑफर्स – बिग डे चा शुभारंभ करण्यात आला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवजीवन प्लसचे स्टोअर भगव्या रंगात रंगले आहे. स्टोअरला भगव्या रंगाची सजावट करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनीदेखील भगवा गणवेश धारण केला आहे. संपूर्ण देशाच्या आनंदात सामील होण्याच्या नवजीवन प्लसच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.