जळगाव – येथील जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी झालेल्या हिरक-महोत्सवी समारंभात जेष्ठ रंगकर्मी व वरिष्ठ पत्रकार संजय निकुंभ यांना सांस्कृतिक क्षेत्रात, गत वर्षातील १२ महिन्यातील विविध १२ प्रकारात विशेष कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘आर्टीस्ट ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आले .
संजय निकुंभ यांनी गत वर्षात अनुक्रमे ,जानेवारीमध्ये नाशिकला राज्य कामगार नाट्य स्पर्धेत जागतिक कीर्तीचे ‘राशोमान’ चे साभिनय प्रभावी सादरीकरण केले.फेब्रुवारीत देवगिरी फिल्म फेस्टीवल मध्ये स्व-दिग्दर्शित ‘फुगेवाला’लघुपटास द्वितीय नामांकन मिळाले .मार्च मध्ये स्व.राजेंद्र भालेराव स्मृती राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट वाचकस्वर’ तसेच मानाचा प्रथम ‘करंडक’ मिळविला .एप्रिल मध्ये मनुमाय प्रोडक्शन कृत ,नियोजित ‘बोलीभाषा ‘आधारित वेब-सिरीज मध्ये ‘चरित्र’ भूमिका तसेच में महिन्यात, स्थानिक नाट्य शिबिरांतर्गत उत्कृष्ट सहभागामुळे आगामी ‘एन.एस.डी. दिल्ली’ तर्फे होणाऱ्यां निवासी कार्यशाळेसाठी निवड . जूनमध्ये राष्ट्रीय पोट्रेट असो.कृत फेस्टसाठी प्रख्यात आर्टीस्ट सचिन मुसळे यांच्या माध्यमातून ‘राशोमान’अभिनित पात्राचे लाईव्ह पोट्रेट ‘मोडेलिंग’ केले .
जुलैमध्ये लोकप्रिय यु-ट्यूब चैनल ‘हॉबी डुबी डू’ संवाद कट्ट्याचे यशस्वी संचालन ,ऑगस्टमध्ये चरित्रात्मक ‘बायोग्राफी’चे टायटल सॉंग व स्क्रिप्टीग,सप्टेम्बरात ‘कार्पोरेट एड.-फिल्म’ चे स्क्रिप्ट आणि डिरेक्शन,ऑक्टोबरमध्ये संस्कारभारती ‘गुरुवंदना’उपक्रमात ,स्व-लिखित ‘शिवशाहीच्या अज्ञात वाटेवर ‘ चे साहित्य –वाचन ,नोव्हेंबरात आर्यन पुरस्कृत, ‘शंभू पाटील-एक सांस्कृतिक मुद्रा ‘ व्हीडीओपट व मानपत्राचे स्क्रिप्टीग, डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर ‘होय हे हिंदुराष्ट्र आहे ‘साठी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ‘रंगभूषा-वेशभूषा’ प्रथम पुरस्कार मिळाला.
संजय निकुंभ यांना वर्षभरातील या १२ क्षेत्रातील विविधांगी यशासाठी दिग्दर्शक चिंतामण पाटील, रमेश भोळे, आनंद मल्हारा, सचिन मुसळे, सचिन जाधव, गणेश सोनार, प्रशांत सोनवणे, किरण अडकमोल, अविनाश जाधव, योगेश शुक्ल, डॉ.रेखा महाजन, दुष्यंत जोशी, अधिवक्ता प्रदीप कुलकर्णी, शरद भालेराव, विनोद ढगे आदींचे मार्गदर्शन व सक्रीय सहकार्य लाभले. वर्षभर सातत्यपूर्ण लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतेय .