जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात नाताळ सण आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सँन्टाक्लॉजच्या वेषात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थिनी परिसरात अवतरले.
यात अंकुश सोनवणे हा विदयार्थी सँन्टाक्लॉजच्या वेषभुषेत होता. तर गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी सँन्टाच्या वेशभूषेत परिसरात अवतरले. परिसरातील लहान मुले व रूग्णांचे नातेवाईकांनी सेल्फीसह चॉकलेट व भेट वस्तूचा आनंद लुटला. प्राचार्य प्रो. विशाखा गणविर, प्रा. मनोरमा इसाक, डॉ प्रियदर्शनी मून व प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी, कर्मचारी यांनी नाताळ सण उत्साहात साजरा केला.