जळगाव – हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटर उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 179895 cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत 200000 ते 250000 cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे.
तरी पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असताना, तापीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने तापी नदीकाठच्या या गावांमध्ये जळगाव जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याद्वारे लोकांना नदीत किंवा घाटाजवळ न जाण्याचा इशारा देण्यात आला. असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे