जळगाव – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतर अजितदादा गटाने शरद पवार यांच्या गटाला समांतर अशा नियुक्त्या करण्याला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीत फारशी फूट पडलेली नाही. असे असले तरी अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील नियुक्त्या केल्या आहे.
अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची तर, शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते.