जळगाव – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखानावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळजनक उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे.
जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेत चोपडा मार्केट येथे रवाना केले. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता, त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता छापा टाकून ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी ही कारवाई केली आहे.