जळगाव – भुसावळ हद्दीत सात ठिकाणी घरङ्गोड्या करून रोकड सह सोने, चांदीचे दागिने चोरणारी टोळी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केली आहे. दरम्यान आरोपींकडून दोन लाखांच्या मुद्देमालासह गॅस सिलींडरही जप्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ हद्दीत सात ठिकाणी घरङ्गोडी झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसासह तालुका, शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, पो.हे.कॉ. निलेश चौधरी, पो.हे.कॉ. यासीन पिंजारी, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. रमन सुरळकर, पो.हे.कॉ. महेश चौधरी, पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, अमर अढाळे अशांनी घरफोड्या मधील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन शेख मुश्ताक शेख अनवर, वय २३ वर्षे, सोहेल शेख अय्युब, वय १८ वर्षे, आफताफ शेख समीउल्ला, वय २२ वर्षे, जुबेर शेख कमरू, वय २६ वर्षे, आणि विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन घरफोड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी संगनमताने एकुण ०७ घरफोडी गुन्ह्याची केल्याची कबुली दिली आहे.
तसेच आरोपींकडून एकुण कि.रू. २,०६,०००/- चे सोन्याचे व चांदीचे दागीने मोबाईल फोन, तसेच गॅस सिलेडर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना दिनांक १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. भुसावळ बाजारपेठ व भुसावळ तालुका पो.स्टे.ला दाखल असलेल्या घरफोड्यांपैकी एकुण ०७ घरफोड्या पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, पो.हे.कॉ. विजय नेरकर, पो.हे.कॉ. निलेश चौधरी, पो.हे.कॉ. यासीन पिंजारी, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. रमन सुरळकर, पो.हे.कॉ.महेश चौधरी पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, अशांनी घरफोड्या मधील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन उघडकीस आणल्या आहे.