Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“तरूणींची दहीहंडी” साठी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष पदी संस्कृती नेवे तर सचिव पदी पियुष तिवारी यांची निवड

by Divya Jalgaon Team
August 26, 2023
in जळगाव, सामाजिक
0
“तरूणींची दहीहंडी” साठी कार्यकारिणी जाहीर

जळगाव – भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 14 वर्षांपासून जळगाव शहरातील मुख्य असणाऱ्या काव्यरतनावली चौक येथे “तरूणींची दहीहंडी“ उत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 10 ते 12 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते.

यावर्षीसुद्धा गुरूवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सायंकाळी 4 ते रात्री 9.30 दरम्यान “तरूणींची दहीहंडी“ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक असते. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध महाविद्यालयील विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो.

दहींहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी युवाशक्ती फाऊंडेशन प्रयत्नशील असते. युवाशक्ती फाऊंडेशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक उपस्थित होते.

यामध्ये गुरुवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे होणाऱ्या तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरवीण्यात आली. सदर उत्सवाचा हा १४वा वर्ष असून या महोत्सवात दही हंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येतो.

यामध्ये अध्यक्ष-संस्कृती नेवे, उपाध्यक्ष-मेघना भोळे, सचिव-पियुष तिवारी, सहसचिव-हर्षल मुंडे, खजीनदार-अर्जुन भारुळे, सहखजीनदार-सागर सोनवणे, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख-तृषान्त तिवारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

Share post
Tags: #Bhawarlal and Kantabai Jain Foundation#Yuvashakti Foundation#तरूणींची दहीहंडीdahi handi
Previous Post

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

Next Post

अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगावची बैठक संपन्न

Next Post
अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगावची बैठक संपन्न

अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगावची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group