Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज – डॉ.भागीरथ चौधरी

पळासखेडेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

by Divya Jalgaon Team
August 25, 2023
in कृषी विषयी, जळगाव
0
गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज – डॉ.भागीरथ चौधरी

जळगाव – कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक राहीले पाहीजे, त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे.

असे संचालक भागीरथ चौधरी ह्यांनी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि ह्यांच्या संयुक्त वतीने पळासखेडे (मिराचे) ता. जामनेर येथील दिनेश पाटील ह्यांच्या कापूस शेतामध्ये आयोजीत ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी जागरूकता आणि व्यवस्थापन’ याविषयावरील शेतकरी मिळाव्यात त्यांनी संबोधीत केले. त्यांच्या बंधन प्रकल्पात कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाकरीता त्यांच्या संस्थेकडून १२ कापूस शेतकऱ्यांच्या समुहाला ६० एकर कापूस क्षेत्राकरीता जपानी तंत्रज्ञान पी बी नॉट व कामगंध सापळे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा विनामुल्य वापर करण्यात आला. कापूस हे राज्यातील महत्वाचे नगदी पीक असुन कापसाची उत्पादकता खुप कमी आहे. कापूस पीक आता फुल आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे आणि कोठेही कापूस पिकांत कामगंध सापळे लावण्यात आलेले नाही.

राज्यात २०१४ पासुन गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. कापूस लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनात पिकामध्ये निरीक्षण करून गुलाबाच्या कळी प्रमाणे असणाऱ्या डोमकळ्या तोडून नष्ठ कराव्यात, एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी. अंडी नाशक किटकनाशकाची फवारणी करावी, असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ व कृषिविद्या, विस्तार आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बी. डी. जडे ह्यांनी मार्गदर्शनात मांडले.एस.ए.बी.सी.चे शास्त्रज्ञ डॉ.दिपक जाखड ह्यांनी कापूस पिकामध्ये पी बी नॉट चा वापर व कामगंध सापळे कसे लावावेत ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

जैन इरीगेशन कंपनीचे सामाजीक कार्य खुप कौतुकास्पद आहे. ठिबक सिंचनाचा व्यवसाय करणारी ही कंपनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीच्या समस्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे बघून तसेच नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठं काम जैन इरीगेशन करीत आहे, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा कृषि विभाग आत्मा चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवादे ह्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

Share post
Tags: # Palaskheda#Dr. Bhagirath Chaudhary#farmal#shetkari#गुलाबी बोंड अळीDivya Jalgaonjain irrigation
Previous Post

जिल्ह्यात १८८९ बालके अतितीव्र कुपोषित

Next Post

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

Next Post
बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group