Sunday, November 30, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचं बनावट फेसबुक खात

बदलीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी लढवली अनोखी शक्कल

by Divya Jalgaon Team
July 27, 2023
in गुन्हे वार्ता
0
तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचं बनावट फेसबुक खात

aman mittal

जळगाव – वेगवेगळ्या पद्धतीने सायबर चोरटे शक्कल लढवून फसवणूक करत असल्याचे अनेक उदाहरणे तसेच घटना समोर आले आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. सायबर चोरट्याने चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्याचा फायदा घेत त्यांचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे घरगुती साहित्य विक्री करावयाचे असल्याचे सांगत फसवणुकीची अनोखी शक्कल लढवली.

तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल हे कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपुर्वीच त्यांची प्रशासकीय बदली झाली आहे. दरम्यान, अमन मित्तल यांच्या नावाने सायबर चोरट्याने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यावर स्वत: अमन मित्तल असल्याचे भासवून बदली झाल्यामुळे घरगुती सामान विक्री करावयाचे असल्याचे पोस्ट संबंधिताने फेसबुक वरून टाकली. दरम्यान बनावट फेसबुक तयार करण्यात येवून त्या माध्यमातून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत अमन मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले.

त्यानंतर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत असल्याची खात्री झाल्यावर तात्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच प्रकारबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांना कळविले. तसेच संबंधित बनावट फेसबुक खातं व त्यावरून फसवणूक संदर्भातील मॅसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना व्हॉटसटॲपवरून पाठविले आहे.

सायबर चोरट्याने फ्रिज , वॉशिंग मशीन, डायनिंग टेबल, सोफा सेट असे घरगुती सामान चांगल्या स्थितीत असून केवळ 63 हजारात त्याची विक्री असल्याच्या पोस्ट सोबतच त्याचा पेटीएम क्रमांक सुध्दा टाकला होता. याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी स्वत: बँक अकाऊंट नंबरसह संपुर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सुध्दा पाठविला होता. या संबंधित माहितीवरून बनावट फेसबुक खात तयार करण्याऱ्याचे नाव गोवर्धन लाल साहू असं असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराला पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला असून ऑनलाईन पध्दतीने अमन मित्तल यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकारात कुणाचीही फसवणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जळगाव ब्रेकिंग

तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल हे कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपुर्वीच त्यांची प्रशासकीय बदली झाली आहे. दरम्यान, अमन मित्तल यांच्या नावाने सायबर चोरट्याने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यावर स्वत: अमन मित्तल असल्याचे भासवून बदली झाल्यामुळे घरगुती सामान विक्री करावयाचे असल्याचे पोस्ट संबंधिताने फेसबुक वरून टाकली. दरम्यान बनावट फेसबुक तयार करण्यात येवून त्या माध्यमातून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत अमन मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले. त्यानंतर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत असल्याची खात्री झाल्यावर तात्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच प्रकारबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांना कळविले. तसेच संबंधित बनावट फेसबुक खातं व त्यावरून फसवणूक संदर्भातील मॅसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना व्हॉटसटॲपवरून पाठविले आहे.

सायबर चोरट्याने घरगुती सामान विक्री असल्याच्या पोस्ट सोबतच त्याचा पेटीएम क्रमांक सुध्दा टाकला होता. याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी स्वत: बँक अकाऊंट नंबरसह संपुर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सुध्दा पाठविला होता. या संबंधित माहितीवरून बनावट फेसबुक खात तयार करण्याऱ्याचे नाव गोवर्धन लाल साहू असं असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकाराला पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला असून ऑनलाईन पध्दतीने अमन मित्तल यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकारात कुणाचीही फसवणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share post
Tags: #Aman mittal#Cyber CrimecollecterCrime newsDivya Jalgaon
Previous Post

वस्तीगृहातील ५ अल्पवयीन मुलींचे अत्याचार ; तिघांविरुद्ध गुन्हा 

Next Post

अविश्वास ठरावामुळे भाजपाची नाचक्की

Next Post
अविश्वास ठरावामुळे भाजपाची नाचक्की

अविश्वास ठरावामुळे भाजपाची नाचक्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group