जळगाव – अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखी सोहळा झाला. 460 मुलं-मुली सहभागी झालेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रूक्मिणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
मुले विठ्ठल रूक्मिणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले. मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, अरविंद बडगुजर, नाना सर आणी शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.