जळगाव – ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील अतिमहत्वाचे व्यक्ती, मंत्री, खासदार, आमदार मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी जळगाव शहरातील आकाशवाणी ते गोविंदा रिक्षा स्टॅाप मार्गावरील वाहतूक मंगळवार, 27 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 ते 23.00 वाजेपर्यंत तात्पुरता प्रवेश बंद असणार आहे. या मार्गावर व्हीव्हीआयपी व्यक्ती तसेच कार्यक्रमाकरीता येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहने, एस.टी बस, रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस या वाहनासाठी यामार्गावर प्रवेश असेल.
नागरिकांना व इतर वाहनधारकांना खालील पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाबळ, एम.जे. कॉलेज, तसेच गावात येणारे नागरिक व वाहनधारकांना आकाशवाणी चौक- प्रभात चौक-महेश चौक- रिंगरोड मार्ग- गोकुळ स्वीट मार्ट- शाहू महाराज रुग्णालय- नूतन मराठा कॉलेज समोरुन- गोविंदा रिक्षा स्टॉप या मार्गाचा जाण्यासाठी व वाहतुकीसाठी उपयोग करावा.
जळगाव शहरातून एम.जे. कॉलेज, महाबळ, भुसावळ, धुळेकडे जाणारे नागरिक व वाहनधारकांनी टॉवर चौक- चित्रा चौक- बेंडाळे चौक- सिव्हील हॉस्पीटल- पांडे चौक-सिंधी कॉलनी- ईच्छादेवी- आकाशवाणी चौक या मार्गाचा येण्यासाठी व वाहतुकीसाठी वापर करावा. असे लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक जळगाव शहर वाहतुक शाखा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.