जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात समान संधी केंद्राचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक, डॉ. भगवान वीर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव वाय एस पाटील, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील, समान संधी केंद्राचे समन्वय प्रा.डॉ रामटेके यांच्यासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागास भेट देऊन ग्रंथालय उपक्रमांची माहिती घेतली.