Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

by Divya Jalgaon Team
November 10, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. एवढेच नव्हे तर ‘एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?.

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘राजद’ने मोठी आघाडी घेतली होती. महागठबंधनने जवळपास 113 जागांपर्यंत मुसंडी मारली होती. त्यामुळे महागठबंधन सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्याच्या घडीला राजद 60 तर काँग्रेस 20 आणि डावे पक्ष 17 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे महागठबंधनची घौडदौड 100 जागांपर्यंत सिमीत राहण्याची शक्यता आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. सध्या ‘एनडीए’कडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, नंतरच्या टप्प्यात ही आघाडी कमी झाल्यास लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

अजून पहा 

सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार

Share post
Tags: #Bihar ElectionBihar Election Results 2020bjpNDA inches ahead after scarePatnaPolitical Newsबहुमताच्या दिशेने वाटचालभाजप सर्वाधिक जागा जिंकणार?
Previous Post

सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार

Next Post

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे राज्य येणार – खा. संजय राऊत

Next Post
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे राज्य येणार - खा. संजय राऊत

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे राज्य येणार - खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group