Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

by Divya Jalgaon Team
May 26, 2023
in क्रीडा, जळगाव
0
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.

कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.

जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला. जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४)

Share post
Tags: #Jain Irriagation#jain sports news#ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद
Previous Post

महिलेच्या पोटातून अडीच किलोचा द्राक्ष गर्भ काढला

Next Post

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

Next Post
एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group