Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

by Divya Jalgaon Team
April 29, 2023
in जळगाव, सामाजिक
0
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

जळगाव – जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी अग्रीशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या व्हिक्टोरीया डॉक पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक वाहून आणणाऱ्या जहाजाला आग लागली होती. ही आग प्रचंड अशी होती. ती विझविण्याचे कार्य सुरू होते.

त्यावेळी मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्निशमन सेवा दिन व अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. जैन फूड पार्क येथे अग्निशमन दिवस व सप्ताहाच्या निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती सादर केली जात आहे.

त्याकाळी आग विझविण्यासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद अग्निशमन जवानांना कंपनीच्या सहकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील, फायर सेफ्टी विभागाचे सेफ्टी अधिकारी स्वप्निल चौधरी, अमोल पाटील, कैलास सैंदाणे, मनोज पाटील, प्रवीण पाटील, हेमकांत पाटील, सागर बागुल, गणेश मोरे, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, आशिष सुतार, महेंद्र पाटील, जे.जे. पाटील आदी सहकारी उपस्थित होते.

या दिनाच्या औचित्याने आपल्या अवतीभवती ज्वलनशील पदार्थ असतील तर त्याच्या साठवणुकीचा, सुरक्षिततेचा आढावा व त्याबाबतचे अत्यावश्यक नियोजन करून ठेवावे जेणे करून कुठलाही अपघात अथवा अनिष्ठ घटना घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले. अपघात होऊ नयेत याबाबत घेतलेली खबरदारी या शहीद अग्निशमन जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

Share post
Tags: #Fire Service Weekजैन इरिगेशन
Previous Post

बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

Next Post

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा

Next Post
राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group