Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

by Divya Jalgaon Team
April 6, 2023
in जळगाव, व्यापार विषयी
0
जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

jain irrigation

जळगाव – जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी ‘जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी ‘रिवूलिस पीटीई लि.’ (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला.

या मुळे जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसाय, रिवूलिस या सिंचन व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये समाविष्ट झाला आहे. जागतिक सिंचन आणि पर्यावरण क्षेत्रात या एकत्रीत कंपनीची उलाढाल ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (अंदाजे रु. ६,१५० कोटी) इतकी असेल. यामुळे ही कंपनी जगातील उलाढालीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. २१ जून २०२२ मध्ये ‘जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ आणि रिवूलिस यांच्यात करार झाला होता. परंतु या कराराच्या अटीशर्ती व परवानगी पूर्ततेसाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला.  २९ मार्च २०२३ रोजी या संपूर्ण व्यवहाराची पूर्तता झाल्याची माहिती जैन इरिगेशनने दिली आहे.

जैन इरिगेशनकडे एकत्रित कंपनीच्या भांडवलातील १८.७ टक्के एवढे समभाग असतील.  एकत्रीकरण केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये दोन संचालक प्रतिनिधी आणि एक निरीक्षक असेल आणि त्यामुळे जैन इरिगेशनच्या सिंचनातील कौशल्यामुळे एकत्रीकरण केलेल्या कंपनीच्या व्यवसायात वाढ व्हायला मदत होईल. या दोन्ही कंपन्या आता “Rivulis – In alliance with Jain International”  म्हणून ओळखल्या जातील.

वरील व्यवहार पूर्ण झाल्यामुळे खालील गोष्टी साध्य होतील –

  • जैन इरिगेशनचे ३१ डिसेंबर २०२२ रोजी एकत्रित निव्वळ कर्ज अंदाजे ६,४१५ कोटी होते. या व्यवहारामूळे २८०० कोटी रुपयाचे (४४ टक्क्यांनी) कर्ज कमी झाल्या मुळे आता जैन इरिगेशनचे कर्ज ३,६१५ कोटी रूपयांपर्यंत खाली आले आहे.

  • जैन इरिगेशनने ३०० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे २४६० कोटी रु.) ची कॉर्पोरेट गॅरंटी दिलेली होती ती या व्यवहारानंतर मुक्त झाली आहे.

  • जैन इरिगेशनचा नवीन कंपनीशी कराराप्रमाणे सिंचन क्षेत्रात भारतातून दीर्घकालीन पुरवठा करार अस्तित्वात येईल. या करारामुळे रिवूलीसच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ होईल.

  • या एकत्रीकरणामुळे रिवूलिस ही कंपनी त्यांच्या असलेल्या बाजारपेठांमध्ये जैन कंपनींच्या ब्रॅंडेड उत्पादनांचा प्रचार व प्रसार करेल.

  • जैन इरिगेशन ही सिंचन क्षेत्रातील मोठ्या नेतृत्व असलेली कंपनी म्हणून नावारुपास येईल. त्यामुळे भविष्यातील व्यवसायात कंपनीला चांगली संधी राहील. तसेच कंपनीच्या भारतातील सिंचन व इतर व्यवसायास खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल व त्या जोडीला जगातील सिंचन व्यवसायात व्यापक वाढ होईल. यामुळे जैन इरिगेशनच्या एकल ताळेबंदातील कर्जात घट होईल.

Share post
Tags: #Anil jain#jain irrigarion business newsजैन इरिगेशन
Previous Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

Next Post

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Next Post
श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group