Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

by Divya Jalgaon Team
March 10, 2023
in जळगाव, सामाजिक
0
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जळगाव  – नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा(Celebrating Safety Week) केला जाईल याची सुरवात आज सामूहिक सुरक्षेची शपथ घेऊन झाली.

जैन इरिगेशनचे वरीष्ठ सहकारी सुनिल गुप्ता यांनी सर्व सहकाऱ्यांना दैनंदिन सुरक्षेसह औद्योगिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. आपली दैनंदिन सुरक्षा करत असताना आपत्कालीन परिस्थीतीत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. यातून दूर्घटना कमी होऊन अपघात कसे कमी होतील, यावर लक्ष दिले पाहिजे. औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करताना सुरक्षेबाबत सजग राहिले पाहिजे. वर्षभर कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षांविषयी उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे; जेणे करून अपघात कमी होतील.

जैन इरिगेशन कंपनीचा प्रत्येक सहकारी हा वाहन चालवितांना हेल्मट वापरतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे कंपनीतील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धा, सुरक्षा पोस्टर चित्रकला आणि नाट्य रूपांतर हे कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण झाले. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, संजय पारख, वाय. जे. पाटील तसेच सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, कैलास सैंदाणे, अमोल पाटील व सर्व अधिकारी यांनी या सप्ताहात सुरक्षासंबंधी जनजागृती केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि च्या कंपनीच्या जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, जैन प्लास्टिक पार्क आणि टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्क येथे जैन ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च २०२३ या आठवड्यात विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाईल. यानिमित्त सुरक्षा व जनजागृती प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी सहकाऱ्यांनी सुरक्षेची शपथ घेतली.

Share post
Tags: #Celebrating Safety Week#National Safety Council#Our focus is zero harmजैन इरिगेशन
Previous Post

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल!

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

Next Post
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती - २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group