Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा परिवर्तनाचा प्रवास उलगडणार

by Divya Jalgaon Team
March 6, 2023
in जळगाव, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये मागीलवर्षी डॉ. अभय बंग यांनी प्रथम पुष्प गुंफले होते. यावेळी श्री. देवाजी तोफा हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर ते संवाद साधतील. अवघ्या 500 लोकवस्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रौचक इतिहासासह परिवर्तनाची प्रेरक कहाणी काही महत्त्वाच्या आठवणींचे क्षण उलगडणार आहेत.

जैन हिल्समधील गांधी तिर्थ येथील कस्तूरबा सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर ला संध्याकाळी ४ वाजेला श्री. देवाजी तोफा व्याख्यानात मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असेल. वरिष्ठ गांधीयन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यात तत्वनिष्ठता, सज्जनता आणि विवेकशीलता यांचा संगम होता.

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी कार्य केले आणि सर्वोदय समाज घडविण्यासाठी दिशा दिली. त्यांच्या सन्मानार्थ 2021 पासून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. मागील वर्षी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शन केले तर यावर्षी श्री. देवाजी तोफा दुसरे पुष्प गुंफतील. वन अधिकार कानून – २००६ नुसार २००९ मध्ये सामुहिक वन अधिकार पत्र प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा ही ग्रामसभा देशातील पहिली ठरली होती. यावेळी ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ याचा बुलंद आवाज सार्थक करणारे मेंढा-लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा हे ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ या विषयावर संवाद साधणार आहे.

यावेळी मेंढा-लेखा गावात झालेल्या परिवर्तनिय बदलांविषयीची रोचक माहिती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या स्मृति व्याख्यानाप्रसंगी उपस्थितांना श्री. देवाजी तोफा अवगत करतील. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्यांविषयी ते अवगत करतील. कुणीही न चुकवावे असे या व्याख्यानात ग्रामसभेचे महत्त्व त्यातील बाराकावे समजण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, सरपंच, राज्यशास्त्राचे विद्यार्थी यासह आदिवासी भागातील बंधू-भगिनींना अभ्यासपूर्ण माहिती श्री. देवाजी तोफा यांच्या व्याख्यानातून मिळेल. त्यामुळे व्याख्यानाप्रसंगी उपस्थितीत राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Share post
Tags: # Dr. Subhash Chaudhary#Anil jain#Ashok bhau jain#Atul Jain#Gandhi Research FoundationJain Hills #Gandhi Research Foundation #Anubhuti English Medium SchoolJain Irrigation #Gandhi ShrineVice President and Managing Director
Previous Post

बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते – साहित्यिक महाजन

Next Post

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

Next Post
गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group