जळगाव – प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी, उपाध्यक्ष वसंत चौधरी, सचिव गोवर्धन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, निलेश नाईक इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील आदर्श विद्यार्थी खिलेश्वरी हिवराळे (इ. १ ली अ), यज्ञेश पानगळे (इ. १ ली ब), फैजान तडवी (इ. २ री अ), कृतिका करोसिया (इ. २ री ब), अंकुश ठाकूर (इ. ३ री), तेजश्री सोनवणे (इ. ४ थी), दर्शना जगताप (इ. ५ वी), पायल राठोड (इ. ६ वी), रोहिणी बारी (इ. ७ वी) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी इ. १ ली ते ७ वी या वर्गातील ‘Save Water’, Rolly Polly’, ‘राजस्थानी गीत’, कोळीगीत’, ‘जोगवा’, ‘देशभक्तीपर गीत’, ‘ललाटी भंडार’, ‘हा गौरव संगीताचा’ इ. या गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी नाटिका, एकपात्री अभिनय, बातमी पत्र, विनोद व वैयक्तिक नृत्य इ. विविध प्रकारात कलागुण सादर केले. कार्यक्रमासाठी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रीमती सुवर्णा सोनार व विद्यार्थी प्रतिनिधी कु. अश्विनी वाघुळदे यांनी केले. सूत्रसंचालन इ. ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमासाठी उज्ज्वला जाधव, छाया पाटील, रशिदा तडवी, ज्योत्स्ना धनगर, राहुल धनगर, राजेंद्र पवार, श्रीकांत पाटील, नरेंद्र वारके, वंदना नेहेते, भूषण बऱ्हाटे, परवेज तडवी या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.