यावल (प्रतिनिधी) – यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दिनांक 23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय गाडी एम एच एकोणावीस डी व्ही 41 99 या गाडीने कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीला अपघात होऊन जागीच गतप्राण झाले.
तर गाडीवरील ड्रायव्हर ला किरकोळ दुखापत झाली असल्याची वृत्त हाती आले आहे भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्या ठिकाणी गाडी ट्रकवर आढळल्या गेली.
त्यात ते जागीच गतप्राप झाले एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते. तसेच एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती. मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला.