जळगाव – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
तर नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अजून १०० ते १५९ कोटी रूपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. सन २०२२-२३ च्या पुंर्नियोजन प्रस्तावास मंजुरी दिली असून या बैठकीत चालू वर्षातील ५९९ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्ह्याचा विकास करतांना शेतकरी केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन प्रलंबित व नव्याने सुचाविलेली कामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्धआहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन करून कामे दर्जेदार व विहीत मुदतीत पुर्ण करून प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपून घेणार नसल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.