जळगाव – शनिवार रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गिरीश कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा रोजमिन खिमानी प्रधान, सानिया रोज प्रधान यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.
सौ नेहा विनीत जोशी .यांच्या निदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले .
त्याचप्रमाणे बाल दिनानिमित्त सोमवारी रोजी रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगांव . हिवाळी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. रती महाजन यांना आमंत्रित करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा सौ. रोजमीन खिमानी प्रधान सोबत सानिया रोज प्रधान या होत्या. हा कार्यक्रम सौ नेहा विनीत जोशी. यांच्या निदर्शनाखाली राबविण्यात आला.
स्पर्धेत बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेत धावण्याची शर्यत, लिंबू चमचा, पुस्तकांचा समतोल साधने, बटाट्याची शर्यत, मागे धावणे, बेडूक उडी शर्यत .अशाप्रकारे मैदानी खेळांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहाने घेण्यात आल्या .तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही परिश्रम घेतले व हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.