जळगाव – डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी दिवस पॅथॉलॉजी विभागातर्फे साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य सेवेतील पॅथॉलॉजीचे महत्त्व आणि योगदान यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमबीबीएसचे विद्यार्थी आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.
चर्चासत्रात प्राध्यापक डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवित चर्चा घडून आणली. याप्रसंगी वरुणराज नन्नवरे, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. सोमेश शेळके यांनी अनुक्रमे पॅथॉलॉजीच्या शाखा आणि करिअर पर्याय, व्हरटोप्सी, टेलिपॅथॉलॉजीची भूमिका या विषयावर मत व्यक्त केले. त्यासाठी पॅथॉलॉजी विभागातील डॉ नेहा महाजन आणि डॉ वैशाली नागोसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.शिरीष गोंडाणे, डॉ.विपिन तोडसे, डॉ. पूजा खांडवे उपस्थित होते.