यावल ( प्रतिनिधी ) – येथील यावल एसटी आगारातील कर्मचाऱ्यासाठी इंधन पॅट्रोलिएम कॉन्वर्सन रिर्चस संरक्षण असोसिएशनच्या वतीने इंधन बचत प्रबोधन व मार्गदर्शन शिबीर पुणे येथील आर डी शेलोद यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
यावल एस टी आगारातील परिसरात कर्मचारीसाठी इंधन बचत प्रशिक्षण व विविध विषयांवर चर्चा शिबीर संपन्न झाले यावलच्या एसटी आगारात एसटी महामंडळाचे मुख्य प्रवक्ते आर डी शेलोद, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबीर केन्द्र शासनाच्या पी.सी.आर.ए इंधन पॅट्रॉलियम कॉनवर्सन रिर्सच संरक्षण असोसिएशनच्या माध्यमातुन येणाऱ्या आठ दिवसात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ,रावेर , मुक्ताईनगर , जामनेर , पाचोरा अशा ११ एसटी आगारात आयोजीत होणारे इंधन बचत प्रबोधन शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहीती आर डी शेलोद यांनी दिली. यावल येथे शिबीरास मोठया संख्येत एसटी आगारातील सर्व कर्मचारी मोठया संख्येत उपस्थित होते.
‘याप्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन ,संदीप अडकमोल (यावल आगार वाहतुक निरिक्षक ), सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विजय पाटील , कमलाकर चौधरी (सहाय्यक वाहतुक निरिक्षक ) , अतुल चौधरी ( लिपिक ) ,यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते ,या प्रबोधनपर शिबीराचे सुत्रसंचालन विजय पाटील यांच्यासह एसटी आगारातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन शिबीरात सहभाग घेतला यावेळी उपस्थितांचे आभार संदीप अडकमोल यांनी मानले .