Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

by Divya Jalgaon Team
September 27, 2022
in जळगाव, राजकीय
0
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

जळगाव –  जळगांव दूध संघाच्या वार्षिक सभेबाबत जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सर्व साधारण सभा आज  हॉटेल क्रेझी कॉटेज, आकाशवाणी चौक, येथे सकाळी ११.०० वाजता संघाचे चेअरमन सौ.मंदाकिनीताई खडसे यांच्या अध्यक्षतेत बोलविण्यात आली होती.

सभेत संघाच्या ४८१ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वार्षिक सभेत प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.एकनाथराव खडसे, यांची उपस्थिती होती. संघाने मागील वार्षिक अहवाल वर्षात ४७२ कोटीची उलाढाल झालेली आहे व संघाने २ कोटींच्या वर नफा कमविलेला आहे. यावेळीस सभासद संस्थांना त्यांनी पुरविलेल्या चांगल्या दुधावर ०.३० पैसे प्रतिलिटर भावफरक सुध्दा जाहीर करण्यात आला.

विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट, २०२० मध्ये संपलेला होता. परंतु कोरोनामुळे निवडणूक (इलेक्शन) पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मागील ७ वर्षात सौ.मंदाताई खडसे यांच्या नेतृत्वात संघाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. संघाने मागील वर्षात सरासरी प्रतिदिन २.३७ हजार किलो दुध खरेदी केले व सरासरी १.९१ हजार लिटर प्रतिदिन विक्री केले व उर्वरीत दुधाचे दुग्धपदार्थ बनवुन विक्री केलेले आहे. अहवाल वर्षात संघाने २१ हजार मे.टन पशुखाद्य विक्री केलेले आहे. याशिवाय तुप, श्रीखंड, टेबल बटर, दही, ताक, दुध पावडर, बटर इ. विक्री केलेली आहे. संघाकडून दुध उत्पादकांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी, कृत्रिम रेतन, वैरण विकास, रोगप्रतिबंधक याकरीता सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात.

सभेत मागील साधारण सभेचे प्रोसिडींग वाचुन कायम करण्यात आले. तसेच मागील वर्षाचे (२०२१-२२) आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये विषयावर कार्यकारी संचालक श्री. मनोज लिमये हयांनी सभागृहाची मंजूरी घेतली. संघास सतत ऑडीट वर्ग “अ” मिळत आलेला आहे. सभासदांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सभागृहात मांडण्यात आल्या. सभागृहाने संचालक मंडळाचे मागील ७ वर्षाच्या कामकाजाचे अभिनंदन केले. म. चेअरमन यांनी त्यांच्या भाषणात संघाने दिलेल्या म्हैस दुधास रु.४६.७२ पैसे प्रति लिटर व गायीच्या दुधास रु.२८.४१ पैसे भाव प्रति लिटर असे सांगण्यात आले. तसेच पुढील वर्षी उत्पादकांना दुधाचे पेमेंट बँकेत न जाता बँकेव्दारा त्यांच्या संस्थेमध्येच केले जाईल. अशी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे असे कळविले.

एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या भाषणात संघाचे कामकाज पारदर्शी आहे व त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही याचे समाधान व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संघाने केलेली ७२ कोटीची गुंतवणूक संघाच्या पुढील ५० वर्षापर्यंत कामास येईल तसेच संघाने जीपीएस, सी.सी.टी.व्ही. व अन्य नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन उत्पादकांना चांगली सेवा कशी देता येईल हयाकडे लक्ष द्यावे अशा सुचना केल्या.

प्रमुख अतिथी, मा.श्री. एकनाथरावजी खडसे, हयाशिवाय संचालक मंडळाचे चेअरमन सौ.मंदाकिनीताई एकनाथराव खडसे, तसेच संचालक मंडळ सदस्य मा.श्री. अॅड.वसंतराव मोरे, मा.श्री.डॉ.संजीव कृष्णराव पाटील, मा. श्री. हेमराज खुशाल चौधरी, मा.श्री. जगदीश लहू बढे, मा. श्री. प्रमोद पांडूरंग पाटील, मा.श्री. अशोक दगडू चौधरी, मा.श्री. सुभाष जगन्नाथ टोके, मा.श्री. अशोक प्रल्हाद पाटील, मा.श्री. प्रल्हाद नारायण पाटील, मा.सौ.शामलताई अतूल झांबरे, मा.सौ.सुनिताताई राजेंद्र पाटील, मा.डॉ.सौ.पुनमताई प्रशांत पाटील संचालक सदस्य उपस्थित होते.

Share post
Tags: #जळगांव दूध संघ#मंदाकिनीताई खडसेएकनाथराव खडसे
Previous Post

यावल विरावली रस्त्यावर मोटारसायकल अपघातात पाच जखमी दोनची प्रकृती गंभीर

Next Post

चिंचोली येथील मेडिकल हबच्या प्रकल्पाला होणार लवकरच सुरुवात

Next Post
चिंचोली येथील मेडिकल हबच्या प्रकल्पाला होणार लवकरच सुरुवात

चिंचोली येथील मेडिकल हबच्या प्रकल्पाला होणार लवकरच सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group