जळगाव – मु.जे महाविद्यालयातील (Moolaji Jetha College) वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे वाणिज्य तसेच इतर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचे (Job placement)
आयोजन करण्यात आले.
डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड,.नाशिक (Datamatics Global Services Limited,.Nashik) या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेण्यात आल्या. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून यासाठी 400 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली.यासाठी कुठलीही फी आकारण्यात आलेली नाही. यात बी.कॉम,एम.कॉम, बी.बी.ए, बी. सी.ए या शाखेच्या विद्यार्थ्यांसह पी.ओ. नहाटा, एस.एस.बाहेती, एस.एस.बी.टी, यासह आय.एम.आर कॉलेजचे विद्यार्थी देखील प्लेसमेंट करीता आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी चांगली प्लेसमेंट मिळत असल्याची माहिती प्रा. डॉ.विशाल देशमुख यांनी दिली.
या उपक्रमासाठी प्रा. डॉ.ए पी.सरोदे- वाणिज्य विद्याशाखा प्रमुख, अब्दुल आरसीवाला- व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख, प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. विवेक यावलकर, प्रा.नितीन चौधरी यांनी परिश्रम घेतले.


